Posts

Turning Points Of Life- Part 3 - आर्ट्स ते लाॅ काॅलेज !

  बारावी संपवतानाच पुण्यात जायचं ठरलं होतं. लहानपणापासून हुशार असल्यामुळे कळत नकळत मीच एक वागण्या बोलण्याची चौकट तयार केली होती, आणि ही चौकट किंवा इमेज मोडायची नसते, हेच आपल्यावर सगळीकडून बिंबवलं जात असतं. १० वी मध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे,जी इमेज बनत गेली, तिचं ११-१२ वी मधील काॅलेजमध्ये एक दडपण वाटायला लागलं होतं. त्यामुळे १२ वी नंतर पुण्यातच शिक्षणासाठी जायचं आणि तिकडे जाऊन ही सगळी चौकट मोडायची असं मनाशी पक्कं केलं होतं. पुण्यात जायचं BA ची पदवी घ्यायची , स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, अधिकारी व्हायचं आणि त्या चौकटीत भारी काम करायचं असा सोप्पा करिअर प्लान तयार होता.   १२ वी ला असताना कोणी सांगितलं माहीत नाही आणि मला कसं सुचलं हे सुध्दा माहित नाही पण लाॅ करण्यासाठी आवश्यक असलेल्या CET चा फाॅर्म भरला होता. ही परीक्षा देण्यासाठी अनेकजण क्लास वैगरे लावतात. पण मी कधीही पुस्तक घेतलं नाही किंवा परीक्षेचा सिलॅबस काय असतो हे सुध्दा बघितलं नाही. फाॅर्म भरल्यानंतर तर मी विसरून सुध्दा गेलो होतो. १२ वी झाल्यानंतर मी मस्त सुटट्या आणि माझ्या दादाचं लग्न enjoy करत होतो आणि अचान...

२०१५ -१६ चाणक्य मंडल परिवारामधील अफलातून दिवस !

मी १० वी ची परीक्षा दिली आणि चाणक्य मंडल परिवार आयोजित करत असलेल्या '१० वी नंतर करिअर निवड' अशा व्याख्यानमालांना जायलो लागलो.एकदा तर आई -वडील आणि कोमल ( माझी बहिण) यांना आग्रह करून पुण्यातील व्याख्यानमालेला घेऊन गेलो.या माझ्या व्याख्यान ऐकायच्या हौसेपायी २ तासाची व्याख्यान आणि ५ तासांचा प्रवास यात कोमलची बिचारीची विनाकारण फरफट व्हायची.😂 मला तर पुणं पहिल्या झटक्यात आवडलं होतं. मी ११ वीला पुण्यातच शिकायला येईन असं घरच्यांना सांगू लागलो ( Manipulate असा अर्थ घ्यावा 🙂) त्यांनी हो ला हो म्हटलं आणि मला घरी घेऊन आले. नंतर मला कुणाकडून तरी समजलं की आईला कुणीतरी सांगितलं की १० वी नंतर लगेच मुलांना बाहेर राहायला पाठवलं की मुलं बिघडतात वैगरे म्हणून..... ( मी आजही आईला हा सल्ला देणारी व्यक्ती शोधत आहे🥺😢 ) सबब, पुण्याची तहान मुंबईवर भागवायला लागली. मधल्या काळात दहावीचा निकाल लागला, टिपिकल Over thinker प्रमाणे मी चांगला निकाल लागला तरी कसं वागायचं आणि वाईट लागला तरी कसं रिएक्ट करायचं हे ठरवून ठेवलं होतं आणि डायलॉगसुध्दा पाठ केले होते. निकाल चांगलाच लागला ! ९६.४० टक्के (Background Song  न...

UPSC ते वकिली व्हाया - चाणक्य मंडल परिवार - व्हाया ज्ञानप्रबोधिनी

Turning Points of Life  गोष्ट पहिली - १० वी च्या प्रिलीमची तयारी ते आयुष्याची प्रिलीमची तयारी मी पुण्यातलं लॉ च शिक्षण पूर्ण करून कर्जतला येऊन राहायला आता एक वर्ष होईल. इकडे आल्यावर खूप लोकांना भेटलो , खूप लोकांना खूप प्रश्न होते , हा आता इकडं कसा ! हा पुण्यात नेमकं करायचा काय आणि आता इकडे येऊन काय करणार ? हे सगळे खरेतर अंगावर येणारे प्रश्न , पण अशा प्रश्नांना उत्तर कशी द्यायची एवढं मात्र पुणे शहराने नक्की शिकून पाठवलं! ( Background मधले डायलॉग- रूको जरा !! सब्र करो !) या प्रश्नांची उत्तर शोधताना गेल्या ८-९ वर्षांची स्वतःचीच स्वतःच्या मनामध्ये असणारी शॉर्टफिल्म तयार झाली. तीच शॉर्टफिल्म तुमच्यासमोर हळूहळू मांडतोय. या शॉर्टफिल्ममध्ये माझा UPSC कडे सुरू होणारा प्रवास - व्हाया चाणक्य मंडल - व्हाया ज्ञानप्रबोधिनी करत वकिलीकडे कसा झाला हे सगळं सांगणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात, अशा काही घटना घडतात की त्याचं संपूर्ण जीवनच बदलवून टाकतात.माझ्या आयुष्यातसुध्दा अशा काही घटना घडल्यात. एखाद्याचं बोलणं आपल्या आयुष्याला एक वेगळचं वळण देऊ शकतं यावर खरं तर माझा विश्वास नव्ह...