२०१५ -१६ चाणक्य मंडल परिवारामधील अफलातून दिवस !
मी १० वी ची परीक्षा दिली आणि चाणक्य मंडल परिवार आयोजित करत असलेल्या '१० वी नंतर करिअर निवड' अशा व्याख्यानमालांना जायलो लागलो.एकदा तर आई -वडील आणि कोमल ( माझी बहिण) यांना आग्रह करून पुण्यातील व्याख्यानमालेला घेऊन गेलो.या माझ्या व्याख्यान ऐकायच्या हौसेपायी २ तासाची व्याख्यान आणि ५ तासांचा प्रवास यात कोमलची बिचारीची विनाकारण फरफट व्हायची.😂 मला तर पुणं पहिल्या झटक्यात आवडलं होतं. मी ११ वीला पुण्यातच शिकायला येईन असं घरच्यांना सांगू लागलो ( Manipulate असा अर्थ घ्यावा 🙂) त्यांनी हो ला हो म्हटलं आणि मला घरी घेऊन आले. नंतर मला कुणाकडून तरी समजलं की आईला कुणीतरी सांगितलं की १० वी नंतर लगेच मुलांना बाहेर राहायला पाठवलं की मुलं बिघडतात वैगरे म्हणून..... ( मी आजही आईला हा सल्ला देणारी व्यक्ती शोधत आहे🥺😢 ) सबब, पुण्याची तहान मुंबईवर भागवायला लागली. मधल्या काळात दहावीचा निकाल लागला, टिपिकल Over thinker प्रमाणे मी चांगला निकाल लागला तरी कसं वागायचं आणि वाईट लागला तरी कसं रिएक्ट करायचं हे ठरवून ठेवलं होतं आणि डायलॉगसुध्दा पाठ केले होते. निकाल चांगलाच लागला ! ९६.४० टक्के (Background Song न...