Turning Points Of Life- Part 3 - आर्ट्स ते लाॅ काॅलेज !
बारावी संपवतानाच पुण्यात जायचं ठरलं होतं. लहानपणापासून हुशार असल्यामुळे कळत नकळत मीच एक वागण्या बोलण्याची चौकट तयार केली होती, आणि ही चौकट किंवा इमेज मोडायची नसते, हेच आपल्यावर सगळीकडून बिंबवलं जात असतं. १० वी मध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे,जी इमेज बनत गेली, तिचं ११-१२ वी मधील काॅलेजमध्ये एक दडपण वाटायला लागलं होतं. त्यामुळे १२ वी नंतर पुण्यातच शिक्षणासाठी जायचं आणि तिकडे जाऊन ही सगळी चौकट मोडायची असं मनाशी पक्कं केलं होतं. पुण्यात जायचं BA ची पदवी घ्यायची , स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, अधिकारी व्हायचं आणि त्या चौकटीत भारी काम करायचं असा सोप्पा करिअर प्लान तयार होता.
१२ वी ला असताना कोणी सांगितलं माहीत नाही आणि मला कसं सुचलं हे सुध्दा माहित नाही पण लाॅ करण्यासाठी आवश्यक असलेल्या CET चा फाॅर्म भरला होता. ही परीक्षा देण्यासाठी अनेकजण क्लास वैगरे लावतात. पण मी कधीही पुस्तक घेतलं नाही किंवा परीक्षेचा सिलॅबस काय असतो हे सुध्दा बघितलं नाही. फाॅर्म भरल्यानंतर तर मी विसरून सुध्दा गेलो होतो. १२ वी झाल्यानंतर मी मस्त सुटट्या आणि माझ्या दादाचं लग्न enjoy करत होतो आणि अचानक नोटीफिकेशन आलं की १७ में ला ला CET परीक्षा असणार आहे. परीक्षेच्या १ दिवस अगोदर माझा विचार चालू होतो की अभ्यास तर केला नाहीये आणि मी लाॅ करणार आहे हे सुध्दा कोणाला माहिती नाही तरी परीक्षाच नको द्यायला पण; रात्री झोपताना विचार आला की पैसे भरले आहेत तर परीक्षा देऊन तर बघूयात ! म्हणून आज पर्यंत दिलेल्या स्काॅलरशीप वैगरे परीक्षांचा अनुभव पणाला लावून कोणतही टेन्शन न घेता , परीक्षा दिली आणि विसरून गेलो.
१२ वी चा निकाल लागल्यावर पुण्यात सर परशुराम काॅलेजला BA कोर्सला admission सुध्दा घेतलं ( S.P. College म्हणजे जिथे दुनियादारी सिनेमाचं शूटिंग झालं होतं ते काॅलेज) नियमित लेक्चर्ससुध्दा सुरू झाले. मलासुध्दा काॅलेज आवडायला लागलेलं. पण तितक्यात लाॅ CET चा निकाल लागला आणि मला चांगले मार्क्स मिळाले. पण या मार्क्सच्या आधारावर पुण्यातल्या काॅलेजसला नंबर लागेल याची खात्री नव्हती. पुण्यातला माझा रूममेट सुध्दा लाॅ करत होता. तो म्हणाला अरे ! चांगला स्कोअर आलाय घेऊन टाक admission ! पण मला पुण्यातल्या लाॅ काॅलेजसची नावसुद्धा माहित नव्हती. त्या मित्राने सांगितली ती नावं preference list मध्ये निवडली आणि यथावकाश माझा माॅडर्न लाॅ काॅलेजला नंबर लागला. Law करायचं की BA असं दोन मार्ग दिसत असताना 'Destiny' नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी लाॅ करण्याचा निर्णय घेतला! हा निर्णय माझ्या आयुष्यातला आणखी एक Turning Point ठरला !
अर्थात BA सोडून Law कोर्सला admission घ्यायचा निर्णय मला घरच्यांना अजून सांगायचा आणि पटवून द्यायचा होता. पण सर्व प्रकारच्या चौकटी मोडायचं ठरविल्यामुळे आणि यापुढे जे निर्णय घेऊ त्याची जबाबदारी स्वतः ची असेल ही मनाची तयारी केल्यामुळे घरच्यांना सुध्दा हा निर्णय पटवून दिला. ( अर्थात तुमच्या घरात पहिला 'वकील' तयार होतोय अशा प्रकारच्या Manipulating Lines मी वापरल्याच !!!)
लाॅ हे क्षेत्र निवडायचं आणखी एक कारण म्हणजे वकिलांचा असलेला युनिफॉर्म. मला लहानपणापासून युनिफॉर्मचं प्रचंड आकर्षण होतं. बाॅर्डर, टँगो चार्ली, LOC कारगिल टाईप चित्रपट लहानपणीच खूपदा बघितल्याने आर्मी बद्दल प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळेच पाचवी, सहावी सलग दोन वर्ष आर्मी स्कूलतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा दिल्या आणि सैनिकी शाळेत निवडसुध्दा झाली, परंतु घरच्यांच्या आग्रहाखातर सैनिकी शाळेचा निर्णय सोडावा लागला होता. त्यामुळे ज्यावेळी पुन्हा एकदा वकीलांचा युनिफॉर्म दिसल्यावर त्याकडे मन ओढलं गेलं. अर्थात UPSC करायचं की वकीली हे ठरवायला वेळ होता. पण पुढील पाच वर्ष आपल्याला जवळपास २५ पेक्षा जास्त कायद्यांचा अभ्यास करायचा आहे ही भावना प्रचंड उत्साह वाढवणारी होती.
( पुढच्या भागात - Turning Points Of Life - Part 4 - ज्ञानप्रबोधिनी it is ! )
कोर्टाला सुट्ट्या लागल्या दिसतात.. :p
ReplyDeleteAccurate Analysis!
Delete